Raksha Bandhan 2025: बांबूच्या राख्या गेल्या सातासमुद्रापार; धारणी तालुक्यातील बांबू कला केंद्रात तयार होतात आकर्षक राख्या
Eco-Friendly Bamboo Rakhis: मेळघाटातील लवादा येथील कारागिरांनी तयार केलेल्या इकोफ्रेंडली बांबू राख्यांना देश-विदेशात मोठी मागणी आहे. पर्यावरण रक्षण आणि स्थानिकांना रोजगार देणाऱ्या या राख्या आकर्षक डिझाईन्ससाठी ओळखल्या जातात.
नागपूर : भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली राखी विशेष आणि आकर्षक असावी, असे प्रत्येक बहिणींना वाटत असते. बहिणीच्या या अपेक्षेतूनच बांबूच्या इकोफ्रेंडली राख्यांना सातासमुद्रापार परदेशातही मागणी आहे.