

नागपूर : शिक्षणातून समजूतदारपणा येतो असे म्हणतात. असे असले तरी शहरातील ‘भरोसा सेल’कडे गेल्या पंधरा महिन्यात २ हजार ५२६ आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ८५ टक्के प्रकरणे ही सुशिक्षित दांपत्यांनी दाखल केली आहेत. त्यामुळे सुशिक्षितांचा एकमेकांवर ‘भरोसा’ नसल्याचे समाजातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिक्षणातून व्यक्ती ज्ञानी होतो, त्याची समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचा समज समाजात आहे. मात्र, जास्त शिकलेल्या पती-पत्नींच्या नात्यांमध्येच जास्त दुरावा निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. दोघांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर एकमेकांपासून काडीमोड घेण्यात होते.
अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शहर पोलिसांच्या माध्यमातून ‘भरोसा सेल’ चालविण्यात येते. दांपत्यांचे समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा कमी करीत, त्यांचा समेट घडवून आणण्याचे काम या सेलच्या माध्यमातून केल्या जाते. गेल्यावर्षी सेलकडे २ हजार ५० प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यामध्ये ७९४ दांपत्यांचे समेट घडवून आणण्यात आले. १५३ प्रकरणे पोलिसांकडे पाठविण्यात आली. गेल्या तीन महिन्यात ४७६ प्रकरणे नोंदविण्यात आली. यापैकी ८७ दांपत्यांचे समेट घडवून आणला तर १७ प्रकरणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. मात्र, हे काम करीत असताना, सुशिक्षित दांपत्यांचा आडमुठेपणा बऱ्याच प्रमाणात आडवा येतो. त्यामुळे बरीच प्रकरणे ही काडीमोडपर्यंत जाताना दिसून येतात. याउलट अशिक्षितांमध्ये त्याचे प्रमाण केवळ १५ टक्के असून त्यातही समेट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
दृष्टीक्षेपात आकडेवारी
वर्ष - प्रकरणे - समेट - पोलिसांकडे वर्ग
२०२१ - २,०५० - ७९४ - १५३
२०२२ (२८ मार्च) - ४७६- ८७- १७
सुशिक्षितांचे प्रमाण - ८५ टक्के
अशिक्षितांचे प्रमाण - १५ टक्के
पती-पत्नी यांच्यातील वादाची कारणे
अधिकाराची जाणीव असणे
स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता
सासू-सासरे, आई-वडिलांची भूमिका
लग्नानंतर वागणुकीत होणारे बदल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.