
नागपूर : अमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात नव्याने टाकण्यात येणाऱ्या निकृष्ट पाईपलाईन प्रकरणात जबाबदार म्हणून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव खुद्द राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुढे करीत गौप्यस्फोट केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जबाबदार अधिकाऱ्यांचे नावे विचारल्यानंतर सौनिक यांनी शपथपत्र सादर करीत न्यायालयाला तत्कालीन मंत्री आणि उच्च पदस्य अधिकाऱ्यांच्या नावाची माहिती दिली. यांच्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली असून तीन आठवड्यांत त्यावर उत्तर मागविले आहे.