E-KYC : अन्यथा तुमचे राशन होणार बंद! सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक
Ration Card : कुही तालुक्यातील प्रत्येक रेशन कार्डधारक सदस्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तहसीलदार अरविंद हिंगे यांनी फेब्रुवारी महिन्यात आधार कार्डासह प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
साळवा : तहसीलदार अरविंद हिंगे कुही यांच्या मार्गदर्शनात रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या सदस्यांचे येणाऱ्या काळात धान्य बंद होणार आहे.