Nagpur News: हिवाळ्यातही भाज्या महाग ;स्वस्ताईसाठी करावी लागणार डिसेंबरची प्रतीक्षा

El Nino Affects Vegetable Production : पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. नागपूरच्या महात्मा फुले आणि कळमना बाजारात आवक कमी असून दर चढे आहेत. डिसेंबरमध्ये आवक वाढल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.
 Reduced vegetable arrivals at Nagpur's Mahatma Phule and Kalamna markets have kept prices high.

Reduced vegetable arrivals at Nagpur's Mahatma Phule and Kalamna markets have kept prices high.

esakal

Updated on: 

नागपूर, : एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, महात्मा फुले आणि कळमना बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून सर्वच भाज्यांचे दर चढेच आहेत.

साधारणपणे दिवाळीनंतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण होते. मात्र, यंदा उत्पादनात घट झाल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात आवक वाढल्यानंतरच भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...