नागपूर - ‘एकटे जगून जिवाचे हाल होईल, या त्रासातून मुक्त व्हायचे आहे,’ असे हृदयद्रावक शब्द लिहून गंगाधर बालाजी हरणे (वय-८०) आणि त्यांच्या पत्नी निर्मला यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना समर्थनगरात बुधवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आली. या प्रयत्नात गंगाधर यांचा मृत्यू झाला, तर पत्नी निर्मला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.