
नागपूर : निवडणुकीचे निकाल लागल्यावर ४५ दिवसांत निवडणूक याचिका दाखल करता येतात. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख सात जानेवारी होती. विधानसभा निवडणुकीचा यंदाचा निकाल अनेकांना धक्कादायक तर काहींच्या जिव्हारी लागणारा होता. याचा परिणाम म्हणजे विदर्भातील पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला आहे. यावर पुढील आठवड्यात एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे