Electric Shock : कुलरचा शॉक लागून बालिकेसह दोघींचा मृत्यू; भिवापूर तालुक्यातील झमकोली येथील घटना
Nagpur News : गेल्या चोवीस तासांत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर व कुही तालुक्यात विजेचा धक्का बसून एक बालिका आणि एक महिला दगावल्या. दोन्ही घटना कुलरच्या स्पर्शामुळे घडल्या.
कुही/नांद (भिवापूर) : कुही तालुक्यातील वेलतूर येथे घरातील साफसफाई करीत असताना कुलरला लागलेल्या स्पर्शाने एका महिलेचा तर भिवापूर तालुक्यातील झमकोली येथील एक तीन वर्षीय बालिकेचाही कुलरच्या शॉकने मृत्यू झाला.