अश्विनी देशकर सकाळ वृ्त्तसेवा
नागपूर, ता. ८: कधी कधी वाटतं, माणूस कितीही मोठा झाला, कितीही पुढे गेला, तरी त्याच्या आयुष्याची मुळं घरातच असतात. आणि त्या मुळांना घट्ट धरून ठेवणारा एक मजबूत आधारस्तंभ म्हणजे बाबा. आमच्या आयुष्यात बाबा हे रक्षण करणारी सावली आणि खंबीर आधारस्तंभ आहेत. जशी झाडाची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात, तसेच आमच्या आयुष्यात बाबांचे स्थान अतिशय घट्ट आणि स्थिर आहे.