Environment Day Special : हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने;‘वनराई’कडून १ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन
Nagpur Green City : वनराई फाउंडेशनने नागपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमधून १ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. त्याचबरोबर या झाडांचा संरक्षण आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेने केले आहे.
नागपूर : इतर शहरांमध्ये फोफावलेल्या सिमेंटच्या जंगलांच्या तुलनेत नागपूर हिरवेगार आहे. त्यामुळे नागपूरच्या रस्त्यावरून सफर करणे, हा सुखावह अनुभव असतो. नागपूर हिरवे करण्यात वनराई फाउंडेशनचे महत्त्वाचे योगदान आहे.