नागपूर - पुरुषाशी भूतकाळात महिलेचे काहीही संबंध असोत, ‘ति’च्या नैतिकतेबद्दल काहीही समजुती असोत. एकदा एखादी महिला शरीर संबधाच्या कृतीस नकार देत असल्यास पुरुषातर्फे करण्यात आलेला तो अत्याचारच असेल. एव्हाना, पुरुषातर्फे त्यानंतर करण्यात येत असलेली प्रत्येक कृती ही अत्याचार ठरेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.