
नागपूर : पुत्ररत्न व्हावे ही इच्छा पूर्ण न झाल्यानंतर नशिबी कन्यारत्न आले की मनात राग धरून जन्माला घातलेल्या मुलींना कधी झाडाझुडपांत तर कधी रुग्णालयाच्या पायरीवर ठेवून मायबाप पलायन करतात. नुकतेच मेडिकलमध्ये एका नकोशीला सोडून मायबापांनी पलायन केल्याची बाब उजेडात आली.