
नागपूरः दातांची निगा योग्य न राखल्याने कीड लागून अनेक आजार संभवतात. आजारामुळे दात कमकुवत होऊन पडतात. नंतर दंत चिकित्सकाकडून ‘डेंटल इम्प्लान्ट’ शस्त्रक्रिया करावी लागते. कोरोना काळात ‘म्युकरमायक्रोसिस’आजारामुळे अनेकांचा जबडाही काढण्यात आला. त्यानंतर करण्यात येणारे इम्प्लॉन्ट खर्चिक असल्याने कमी खर्चिक ‘डेंटल इम्प्लॉन्ट’ देशातच तयार करण्यासाठी विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांंत्रिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्याने स्टार्टअप सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक महागडे उपचार आता कमी खर्चात देशातच करता येणार आहे.