मिहानची लॉकडाउनमध्येही निर्यातीत झेप, 'वर्क फ्रॉम होम'मुळे २५ टक्के वाढ

mihan
mihane sakal

नागपूर : विदर्भाच्या विकासाचे महाद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या मिहानमधून (mihan nagpur) टाळेबंदीत सॉफ्टवेअर, औषध, विमानाच्या सुट्याभागासह इतर वस्तूंच्या निर्यातीत २५ टक्के वाढ झाली. सॉफ्टवेअर कंपनीने टाळेबंदीत ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) करीत ५५ टक्के तर इतर साहित्यांच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या विपरीत परिस्थितीही मिहानने चांगली झेप घेतली आहे. (export 25 percent increase in mihan of nagpur)

mihan
भाजपच्या माजी आमदाराला काँग्रेसचा हात?

गेल्या सहा महिन्यात मिहानमध्ये तीन कंपन्यांनी गुंतवणूक केल्याचे सुखद बातमीनंतर आता निर्यातही वाढल्याची माहिती पुढे आली आहे. विद्यमान कंपन्या चांगली कामगिरी करू लागल्याने मिहान आता रुळावर येऊ लागल्याचे बोलले जात आहे. देश जेव्हा थांबला होता तेव्हा सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम'च्या मदतीने व्यवसाय वाढविला. काही कंपन्यांची निर्यात वाढल्याने त्यांनी विस्ताराच्या योजनाही आखल्या आहेत.

टाटा, रिलायन्स टॉप -

विमानांचे सुटे भागासह औषधी आणि इतर साहित्यांच्या निर्यातीत टाटा एरोनॉटिक लिमिटेड आणि रिलायन्स एरोस्पेसची भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच ल्युपिन फार्मा कंपनीनेही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भविष्यात आणखी काही कंपन्या निर्यातीच्या शर्यतीत उतरू शकतात.

संचालक मुंबईत, काम उपराजधानीत! -

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबईतून कारभार करीत आहेत. कंपनीचे काम मात्र, उपराजधानीत केले जाते. त्यामुळे काहीही अडचण आल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागते. विकास आयुक्तांकडूनही नियमित एमएडीसीकडे सहकार्याची मागणी करतात. मात्र, त्यांच्या अडचणीला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. मिहानमधून वाढत असलेली निर्यात लक्षात घेता आता वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती नागपुरात करणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. असे केल्यास मिहानच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

निर्यातीची आकडेवारी

वर्ष औषधांसह इतर साहित्य सॉफ्टवेअर (रक्कम कोटीत) एकूण निर्यात

  • २०१७-१८ - ४०६ ३०९ ७१५

  • २०१८-१९ - ५०५ ७३९ १२४४

  • २०१९-२० १०४५ ९९६ २०४१

  • २०२०-२१ १४२१ १२१५ २६३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com