नागपूर: औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करून बनावट व निकृष्ट ‘कामराज कॅप्सूल’ची विक्री आणि वितरण प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..या प्रकरणात औषध निरीक्षक प्रशांत रामचंद्र रामटेके (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. विनीत विनायक वरघने (प्रोप्रायटर, मेसर्स विन्स फार्मास्युटिकल्स, संदेश दवा बाजार, गांधीबाग), मेसर्स अल्टिमेट आयुर्वेद, (टीएस मान मार्केट, दशमेशनगर, भोपा रोड, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) आणि मोहित अश्विनकुमार चड्ढा (मेसर्स ब्रम्हानंद आयुर्वेदा (ओपीसी) प्रा. लि., जालंधर, पंजाब) अशी आरोपींची नावे आहेत..Amit Shah Kolhapur Speech : अमित शहांकडून कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट ‘शिवसेना प्रमुख’ म्हणून उल्लेख.मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रामटेके हे नागपूर विभागातील सहआयुक्त या कार्यालयात औषध निरीक्षक आहेत. तपासादरम्यान त्यांनी गंजीपेठ येथील संदेश दवा बाजार येथे असलेल्या विन्स फार्मास्युटिकल्स या दुकानातील ‘कामराज कॅप्सूल’चा बॅच क्रमांक आणि इतर तपासणी केली. त्यात तफावत आढळल्याने त्यांनी साठा जप्त करीत, कॅप्सूलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले..कामराज कॅप्सूल हे वेदनानाशक आयुर्वेदिक औषध आहे. मात्र, तपासात औषध निकृष्ट आणि त्यात ४०.३७ एमजी ‘पॅरासिटामॉल’, उत्तेजित करणारे टाडाफिल ३९.८३ एमजी आणि वेदनाशामक म्हणून वापर करणारे डायक्लोफेन सोडियम हे १२.३१ एमजी असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे हे उत्पादन बनावट आणि जनतेच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईमुळे बनावगिरी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे..India Tour of England : भारतीय संघातून मोठी अपडेट्स; हार्दिक पांड्याची इंग्लंड दौऱ्यातून माघार, जसप्रीत बुमराह, विराट कोहली याचं काय? .आधी नोटीस, नंतर कारवाईप्रशांत रामटेके यांनी आरोपी म्हणून मेसर्स विनीत विनायक वरघने, मेसर्स अल्टिमेट आयुर्वेद आणि मोहित अश्विनकुमार चढ्ढा यांच्याविरोधात नोटीस बजावून खुलासा मागविला होता. त्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रामटेके यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करूण तपास सुरू केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.