Nagpur News : प्रियकराने उडविली प्रेयसीच्या अपहरणाची अफवा; तपासानंतर सत्य आले बाहेर

महिलेच्या पतीने तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर तीला स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन गेला.
woman kidnapping

woman kidnapping

sakal

Updated on

नागपूर - महिलेच्या पतीने तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर तीला स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन गेला. मात्र, या घटनेनंतर प्रियकराने तिच्या अपहरणाच्या अफवा पसरवून एकच खळबळ उडवून दिली. शुक्रवारी (ता.१३) दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली. मात्र, तपासानंतर ही केवळ अफवा असल्याचे उघड झाल्यावर, पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com