Nagpur Teacher Scam : कधीच शिकवलं नाही, पण १० लाखात शिक्षक बनला, उपसंचालकांनी थेट मुख्याध्यापक केला; घोटाळा कसा झाला?

Nagpur Teacher Scam : नागपूरच्या यादवनगरमधील शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपद मिळवण्यात आले असून, या घोटाळ्यात शिक्षण विभागातील तिघांना अटक झाली असून आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
Nagpur Teacher Scam
Nagpur Teacher Scam Sakal
Updated on

नागपूर : नागपुरातील यादवनगरात असलेल्या एस. के. बी. उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळेचे बनावट शिक्षक असल्याचे कागदपत्र तयार करून पराग पुडके याने मुख्याध्यापकपद मिळविले. मात्र, या शाळेचे कागदपत्र तयार करून देण्यास त्याला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक नीलेश मेश्राम याने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी उपसंचालक कार्यालयातील दोन आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी अशा तिघांना रविवारी (ता.१३) अटक केली. आता अटकेतील आरोपींची संख्या पाचवर गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com