Dattawadi News : गजानननगर मैदानातील पाच बाकांवरून सुरू झालेल्या वादात खोटा चोरीचा आळ आला. दौलतवाडीतील नागरिकांनी याला तीव्र विरोध करत नगर परिषदेला स्पष्टीकरणाची मागणी केली.
दत्तवाडी : गजानननगर सोसायटी क्रीडा मैदानातील पाच बाके चोरी गेल्याची तक्रार सोसायटीतील ज्येष्ठांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. प्रशासनाने दखल घेत ती बाके मैदानात आणून ठेवली.