Wildlife Conflict: कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी चंद्रशेखर बल्की ठार झाले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोंढाळी : कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर-चिखली मार्गावर गुरुवारी रात्री बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात चंद्रशेखर बल्की यांचा जागीच मृत्यू झाला. वर्षभरात कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघ-बिबट्यांनी ११० हून अधिक जनावरे फस्त केली आहे.