अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; बळीराजा धास्तावला

खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला आहे.
Loss by Untimely Rain
Loss by Untimely Rainsakal
Summary

खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला आहे.

जलालखेडा (जि. नागपूर) - खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून (Natural Disaster) जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने (Untimely Rain) फटका दिला आहे. नरखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान (Loss) झालं आहे. यामुळे आता पुढे काय करावे असा प्रश शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे डोळ्यातून अश्रू पडले असून यातून सावरण्याचा पुन्हा शेतकरी प्रयत्न करणार आहे. पण आलेल्या अस्मानी संतावर मात करण्यासाठी त्याला सुलतानी दिलास्ताची गरज आहे.

आधी पावसाने खरीपाचं नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिट सुरू झाली. नरखेड तालुक्याततील काही भागात सकाळपासून अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यात काढणीला आलेली भिजली आहे.

काही शेतकऱ्यांनी हरभरा, गहु पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तुर पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींची तुर कापणीच्या तयारीत आहे या सर्व फटका हरभरा पिकला व तुरीला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच जोमात असलेला गहू पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

Loss by Untimely Rain
नागपूर मनपा निवडणूक मेपर्यंत पुढे जाण्याची शक्यता

संत्र्यांच्या बागांनाही मोठा फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळे गहू आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. काही भागात पावसासह गारपिट झाल्यामुळे याचा हरभरा, गहू, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. खरीपाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीवर अवकाळीचं संकट ओढवलंय. बदललेल्या निसर्गचक्रामुळे आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसलं आहे. पावसामुळे गारठ्यात वाढ झाली असून भाजीपाला वर्गीय पिकांवर याचा परिणाम होत आहे.

31 तारखेपर्यंत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अनेकांची आंब्या बहाराच्या संत्र्याची तोडणी व्हायची आहे. अश्यात वर्षभराच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शाक्यता आहे.तर आंब्या बहाराच्या फुटीवर यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता आहे.दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com