

जलालखेडा : रब्बी हंगामात देखील एक रुपयात पीकविमा योजनेत सहभाग घेण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे. यामध्ये गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारीसाठी शेतकरी योजनेत सहभाग घेऊ शकतात. योजनेत सहभाग घेण्यासाठी १५ डिसेंबर ही ‘डेडलाइन’ आहे. त्यामुळे जेथे हजारो रुपयांचा खर्च केला, तेथे एका रुपयाला का घाबरायचं? नैसर्गिक आपत्ती आल्यास फायदा होणार अशी शेतकऱ्यांची भावना आहे.