
पुसद : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटो आणि वांग्याची दहा रुपये कॅरेटने व्यापाऱ्यांनी हर्राशी केली. हा बेभाव दिसताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी भाजीपाला व्यापाऱ्याला न विकताच भाजी मंडईत अक्षरशः फेकून दिला.