शेतकऱ्यांने दोन एकर सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर

नरखेड तालुक्यातील वाढोणा येथील शेतकरी वासुदेव दंढारे यांनी यावर्षी दोन एकर सोयाबीन ची पेरणी केली. पिकसुध्दा चांगल्या परीस्थिती मध्ये होते.
Rotavator
RotavatorSakal

मेंढला (जि. नागपूर) - नरखेड तालुका सोयाबीनचे (Soybean) सर्वात जास्त उत्पादन (Production) घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो परंतु दोन ते तीन वर्षांपासून सोयाबीन पिकावर खोडमाशी, येलो मोजॉक , खोडअळी, या सारख्या रोगामुळे सोयाबीन पिक दरवर्षी शेतकऱ्यांच्या (Farmer) हातुन जात आहे. हे रोग इत्यादी भयंकर आहे की सोयाबीनला शेंगा येण्याच्या वेळेस संपूर्ण सोयाबीन वाळायला सुरुवात होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकावर रोटावेटर, चालवत आहेत ही सध्या नरखेड तालुक्यातील परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक समजल्या जाणारे पिक असुन ते दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांच्या घरी येणारे पिक असुन शेतकरी दरवर्षी सोयाबीन पिकावर दिवाळी सण मोठा उत्साहाने साजरा करत असतो. परंतु, दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जात आहे. शासनाकडून कोणतीच नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळाली नाही. मागच्यावेळी शासनाने मोठा गाजावाजा करत नुकसान भरपाई चा सर्वे केला. परंतु शेतकऱ्यांला अजुन पर्यंत कोणतीच नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, हे नरखेड तालुक्यातील चित्र आहे

नरखेड तालुक्यातील वाढोणा येथील शेतकरी वासुदेव दंढारे यांनी यावर्षी दोन एकर सोयाबीन ची पेरणी केली. पिकसुध्दा चांगल्या परीस्थिती मध्ये होते. परंतु, अचानक सोयाबीन पिवळी पडून वाळत असल्याने त्यांनी दोन एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवला आहे. वातावरण बद्दल, अनियमित पाऊस, कधी दमट वातावरण, या गोष्टीमुळे शेतकऱ्यांला सोयाबीन होणार नाही हे कळुन चुकले असल्याने त्यांनी निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर चार फवारणी केलेली असुन संपूर्ण औषधी ही महागडी, व नामांकित कंपनीचे होते तरी सुद्धा सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातचे गेल्याने सण, उत्सव, घरचा प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. यावषी खर्च निघत नसल्याने घरखर्च, महत्त्वाची कामे कशी करायची असा पेच निर्माण झाला आहे.

Rotavator
काँग्रेसला वाटत असल्यास शहराध्यक्ष बदलावा

दरवर्षी महागाईसह मजुरीचे दर सुध्दा वाढलेले आहे. तसेच मंजुर सुध्दा वेळेवर मिळत नसल्याने शेतातील तण नियंत्रणात कसे आणायचे हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. सोयाबीन पिकाला दरवर्षी शेंगा येण्याच्या वेळेस संपूर्ण सोयाबीन वाळायला लागल्याने शेतकरी सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवत आहेत मागच्यावेळी नरखेड तालुका बोंडअळीच्या नुकसान भरपाईतून वगळ्यामुळे शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचित रहिला. यावर्षी सुध्दा सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सातबारावर कर्ज असल्याने बँक कर्ज देत नाही. अश्या वेळी शेतकरी सावकाराच्या दारात उभा राहण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे सोयाबीन सर्वेक्षणाचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, आरंभी, उदापूर, बानोरचंद, दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, तारा उतारा, खलांनगोदी, दातेवाडी, उमठा, वडविहरा, सिंजर, साखरखेडा, येथील शेतकऱ्यांची आहे

शासनाने सोयाबीन साठी ऑनलाईन करायला लावले. त्यांनतर लॉटरी पध्दतीने निवड केली त्यामध्ये माझा नंबर लागला व सोयाबीन बॅग मिळाल्या त्याच बॅग मधील सोयाबीनची पेरणी केली चार फवारणी केल्या तरी सुद्धा सोयाबीन वर खोडकिडा, यॅलो मोजॉक, या सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. व सोयाबीन ला शेंगाच दिसत नसल्यामुळे मी माझ्या दोन एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवला आहे. तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माझी आहे.

- वासुदेव दंढारे, शेतकरी, वाढोणा

दरवर्षी सोयाबीन पिकावर अज्ञात रोगामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातचे जात आहे. कृषी विभाग सुध्दा या अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कोणताच प्रकारचे उपाययोजना करतांनी दिसत नाही. तसेच, शासनाकडून त्वरित सर्वे करण्याचे आदेश देत नाही. अजुनपर्यंत मागच्यावेळची नुकसान भरपाई तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. समोर येणारी दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात जाणार आहे. शासनाने त्वरीत सोयाबीन सर्वे चे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी.

- दिलेश ठाकरे, महामंत्री, नरखेड तालुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com