आता उघड्या डोळ्यांतून बरसतो पाऊस; आभाळात कोरड्या ढगांची गर्दी

कोतेवाडा शिवारामध्ये कपाशीचे खंगे डोबताना महिला शेतमजूर
कोतेवाडा शिवारामध्ये कपाशीचे खंगे डोबताना महिला शेतमजूर

नागपूर : आज येईल, उद्या येईल, पावसाच्या आशेत आभाळाकडे नजर ठेऊन पाहता पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कधी पाणी (Tears in the eyes of farmers) बरसेल हे आता कुणालाच ठऊक नसते. कोरोनाकाळातून उठल्यानंतर शेती हंगामाला सामोरे जाताना महागाईशी झुंजताना त्याने शेतात कर्ज काढून, उधारी करून पेरणी केली. मृगाने हुलकावणी दिली. आर्द्रा नक्षत्र लागले, पण आकाशात कोरड्या ढगांशिवाय दमदार पावसाची चिन्हे कुठेच दिसत नसली तरी बळीराजाच्या उदास डोळ्यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा (Waiting for the rain) आहे. (Farmers-worried-due-to-lack-of-rain)

यावर्षी वेळेत मॉन्सून पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, दोन आठवड्याचा कालावधी लोटूनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. घाईगडबडीत पेरण्या करणारे शेतकरी चिंतेत पडले आहेत. काही दिवसांपासून आकाशात केवळ कोरड्या ढगांची गर्दी होते. मात्र, पाऊस काही पडत नाही. अशाप्रकारे रुसलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ‘पाणी’ आणायला सुरुवात केली आहे.

कोतेवाडा शिवारामध्ये कपाशीचे खंगे डोबताना महिला शेतमजूर
शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!

मृगाच्या समाधानकारक पावसानंतर गुमगाव परिसरातील कोतेवाडा, वागदरा, दाताळा, धानोली, वडगाव-गुजर, शिवमडका, किरमटी, कान्होली, जामठा, सुमठाणा, गोधनी शिवारातील शेतकऱ्यांनी घाईगडबडीत सोयाबीन, तूर व कपाशीची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीनंतर आणि जमिनीतील ओलाव्यामुळे पिकेदेखील अंकुरली आहेत. मात्र, पीक बहरण्यापूर्वीच पावसाने अचानक दडी मारल्याने पिके करपण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचे ‘हार्टबिट्स’ वाढलेले आहे.

पावसाअभावी शिवारातील कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सोबतच उशिरा पेरणी करणारे शेतकरी आता पावसासाठी आकाशाकडे आस लावून बसले आहेत. या आसमानी संकटाने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असून त्याने देवाला साकडे घालायला सुरुवात केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

(Farmers-worried-due-to-lack-of-rain)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com