
दुसरबिड : बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गावर टोल नाक्यापासून काही अंतरावर एमएच ०४ एलबी ३१०९ क्रमांकाच्या हुंडाई आय टेन कारला भीषण अपघात झाला. या नंतर वाहनाने अचानक पेट घेतल्यामुळे आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. ही घटना आज २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२) दोन्ही रा. मुंबई असे मृतकांचे नाव आहे.