Nagpur Accident : कचऱ्याच्या ट्रकला दुचाकी धडकल्याने युवकाचा मृत्यू ; महिलेसह मुलगा जखमी, डम्पिंग यार्डजवळ अपघात
Accident News : नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डजवळ कचऱ्याच्या ट्रकला धडकून युवकाचा मृत्यू झाला, तर महिलेसह मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला.
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डजवळील धर्मकाट्याजवळ वळण घेणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकला मोपेड धडकल्याने युवकाचा मृत्यू झाला तर महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता.२७) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास घडली.