esakal | कमी भावात सोने विक्रीची थाप; ठकबाजी करणाऱ्या बापलेकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

कमी भावात सोने विक्रीची थाप; ठकबाजी करणाऱ्या बापलेकाला अटक

कमी भावात सोने विक्रीची थाप; ठकबाजी करणाऱ्या बापलेकाला अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पैसेवाल्यांना हेरून अगदी कमी भावात सोने देण्याचे सांगून अनेकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी (Father and son arrested) तहसील पोलिसांनी बापलेकाला अटक केली. मो. शाहरुख अंसारी मुजीबखान (२६) आणि मुजीब खान (५०, रा. मालधक्का, इतवारी) अशी अटक करण्यात आलेल्या (Fraud with people) बापलेकाची नावे आहेत. (Father-and-son-arrested-for-cheating-in-Nagpur-nad86)

मो. शाहरुखचे तहसील हद्दीत सराफाचे दुकान आहे. २०१९ मध्ये शाहरुखची भेट कर्नलबाग येथे राहणाऱ्या समीर अहमद खान (३२) याच्याशी ओळख झाली. त्यावेळी शाहरुखने समीर यांना ‘आम्ही मुंबई येथून कमी भावात सोने आणून विकतो. तुम्हीही या धंद्यात गुंतवणूक केल्यास फायदा होईल’ अशी बतावणी केली.

समीर यांनी शाहरुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दहा लाख रुपये दिले. त्यापैकी दीड लाख रुपये शाहरुखने परत केले. बरेच दिवस झाले तरी खान पितापुत्राने त्यांना सोने दिले नाही आणि साडेआठ लाख रुपये सुद्धा परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समीर यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून दोघाही बापलेकाला अटक केली. खान बापलेकाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

एका व्यक्तीने शाहरुखला अंगठी देऊन सोनसाखळी बनविण्यास सांगितले होते. शाहरुखने त्याला नकली सोनसाखळी देऊन दीड लाख रुपयानी फसवणूक केली. त्याचप्रमाणे एकाची साडेपाच लाख तर अन्य एका व्यक्तीची अडीच लाखांनी फसवणूक केली आहे. आतापर्यंत पोलिसांकडे चार तक्रारी आल्या असून आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेतली. पीआय जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल वाघ पुढील तपास करीत आहेत.

(Father-and-son-arrested-for-cheating-in-Nagpur-nad86)

loading image