अखेर मृत्यूनेच केली त्यांची सुटका; मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या; अख्ख्या गावात हळहळ

अखेर मृत्यूनेच केली त्यांची सुटका; मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या; अख्ख्या गावात हळहळ

कळमेश्वर (जि. नागपूर) : नऊ महिन्याआधी तरण्याताठया मुलाने विष घेऊन आत्महत्या केली़. वृद्धापकाळात कुटुंबाचा आधार ठरेल, अशी वडिलांची अपेक्षा या घटनेमुळे पूर्णत: धुळीस मिळाली़. मुलाच्या मृत्यूचे हे दु:ख पचवू न शकलेल्या वडिलाचे शल्य अखेर मृत्यूनेच शमले़. वृध्द वडिलांनी विष घेऊन जीवनयात्रा संपविली़. ही मन हेलावून टाकणारी घटना तालुक्यातील सुसुंद्री येथे घडली़. चंद्रशेखर काळे असे मृत वृध्द शेतकऱ्याचे नाव आहे़.

चंद्रशेखर काळे यांच्याकडे तीन ते चार एकर शेती आहे़. या शेतीसाठी त्यांनी बँकाकडून कर्ज घेतले होते़. सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला़. त्याच मुलीच्या लग्नासाठी पुन्हा उसनवारी करावी लागली. त्यातच कोरोना. यामुळे चंद्रशेखर चिंतेत राहू लागले़. वडिलांची ही चिंता २१ वर्षीय गौरवला बघवल्या गेली नसल्याने नऊ महिन्याआधी बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शेतात विष घेऊन आत्महत्या केली़.

तरणाताठ्या मुलाने असे केल्याने आधीच चिंतेत असलेल्या चंद्रशेखर यांच्या दु:खात पुन्हा भर पडली़. त्यातच बँकाचे व नातेवाइकांचे कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावू लागली़. गौरवच्या मृत्यूपासून ते नेहमीच दु:खी राहू लागले होते़. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी शेती विक्रीला काढली़. मात्र, तेही विकली जात नव्हती. त्यातच पुन्हा एका मुलीच्या विवाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती़. उतारवयात हे सर्व दु:ख त्यांच्या पदरी आल्याने पूर्णत: खचून गेले़.

मुलाच्या मृत्यूच्या दु:खामुळे ते आपल्याच विचारात राहायचे़. मुलाच्या मृत्यूचे शल्य त्यांना होते़. मात्र, हे शल्य कमी होत नसल्याने त्यांनीही मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला़. गुरुवारी सकाळी घरी शेतात जातो, म्हणून चंद्रशेखर शेतात गेले़. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली़.

‘तुम्ही असे करायला नको होते’

अवघ्या नऊ महिन्याच्या काळात काळे कुटुंबात होत्याचे नव्हते झाले़. आधी तरणाताठा मुलगा व त्यानंतर काहीच दिवसात चंद्रशेखर यांनी आत्महत्या केल्याने काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला़. घटनेची माहिती कुटुंबीयांपर्यत पोहचताच चंद्रशेखर यांच्या पत्नीने ‘तुम्ही असे करायला नको व्होते’,‘ माझ्यासाठी नव्हते तर मुलीचा तरी विचार करायला हवा होता’ असा हंबरडा फोडला़. दुपारपर्यंत ही माहिती पंचक्रोशीत पसरली़. मुलानंतर वडिलांच्या अशा जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती़.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com