Unbelievable Success : परिस्थिती उलटी; वडील पास, मुलगा चार विषयांत नापास, गोंडपिपरीतील अनोख्‍या निकालाची चर्चा

Father Passes SSC : गोंडपिपरीत मुलाच्या टोमण्याने पेटून वडिलांनी दहावी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन दाखवले, तर मुलगा मात्र चार विषयांत नापास झाला; ही घटना आता चर्चेचा विषय ठरतेय.
Father Passes SSC
Father Passes SSC Sakal
Updated on

गोंडपिपरी : मनात जिद्द पकडली तर कोण काय करेल याचा नेम नाही. तुम्ही तर दहावीची परीक्षा नापास झाले अन् आता मला सांगता असा टोमणा मारणाऱ्या एका मुलाला बापाने शिक्षणाची ताकद दाखवून दिली. जिद्दीने पेटलेल्या बापाने अभ्यास केला. दहावीची परीक्षा दिली अन् उत्तीर्ण करून दाखविली. वडिलांना टोमणा मारणारा मुलगा मात्र चक्क चार विषयात नापास झाला. सोमवारी (ता.१३) दहावीची निकाल जाहीर झाला. यात आलेल्या हा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com