
पारशिवनी : पारशिवनी तालुक्यात नरभक्षी वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्तसंचार सुरू असून त्याने आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे वाघाला वेळीच पकडण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.