मूल : तालुक्यातील भगवानपूर आणि कांतापेठ येथील जंगलात आणखी दोघांचा बळी वाघाने घेतला. मृतांमध्ये संजीवनी संजय मॅकलवार (वय ४५ रा. चिरोली) आणि सुरेश मुंगरू सोपानकार (वय ५२ रा. कांतापेठ) यांचा समावेश आहे. ही घटना मंगळवार (ता. २७) घडली..मूल तालुक्यातील चिरोली येथील संजीवनी मॅकलवार, पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चौघे भगवानपूर येथील जंगलात बांबूच्या बारीक काडया, सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेले होते. बांबूच्या काड्या तोडत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनीवर हल्ला करून जागीच ठार केले. संजीवनीला फरफटत नेत असताना सोबत असलेल्या नातेवाईकांनी आणि पतीने आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावले. तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजीवनी गतप्राण झाली होती. .ही घटना गावात माहीत होताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बोथे, वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथील पोलिस पाटील संगीता चल्लावार, चिरोली येथील पोलिस पाटील गोकुळ मोहूर्ले, चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम, उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा मोका पंचनामा करून मृतदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला..दुसरी घटना तालुक्यातील कांतापेठ येथे घडली. येथील सुरेश मुंगरू सोपानकार हा चिरोली मार्गावर असलेल्या जंगलात बकऱ्या चराईसाठी गेला होता. दुपारी बारा वाजताच्या सुमारास बकऱ्यांचा कळप घरी परतला. मात्र, सुरेश घराकडे परत आला नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांना शंका आली. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने चिरोलीचे जंगल गाठून शोधमोहीम सुरू केली..गावकऱ्यांमध्ये दहशतचिरोलीच्या जंगलात सुरेशचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्याचा एक पाय पूर्णपणे निकामी केला. या दोन्ही घटनेने चिरोली, टोलेवाही, भगवानपूर येथे खळबळ उडाली आहे. परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे..पाचवी घटनामूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यातील मे महिन्यातील ही पाचवी घटना आहे. चंद्रपूर जिल्हयातील सतरा दिवसांतील ही दहावी घटना आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.खरीप हंगाम तोंडावर असताना वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.