esakal | नागपुरातील शासकीय इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच

बोलून बातमी शोधा

null
नागपुरातील शासकीय इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : गेल्या काहो दिवसांपासून राज्यात आगीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. कोरोनाचा भयंकर काळ आणि त्यात अशा आगीच्या घटना यामुळे दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणण्याची वेळ आली आहे. असाच काहीसा प्रकार आज सकाळच्या सुमारास नागपुरात घडला आहे.

नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका शासकीय इमारतीला प्रचंड मोठी आग लागल्याची माहिती समोर येतेय. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतंय. या शासकीय इमारतीत अनेक मोठी कार्यालयं आहेत.

सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे इमारतीतील नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. सुजाण नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही युद्धपातळीवर सुरु आहेत.

सुदैवानं या आगीत कोणतंही जीवितहानी झाली नाही. मात्र शासकीय इमारतीतील साहित्याचं आणि कागदपत्रांचं नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.