
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील जाम ते हिंगणघाट या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ग्रीन प्रोजेक्टला आजंती शिवारात आग लागल्याची घटना बुधवारी (ता.१९) दुपारी घडली. या प्रोजेक्टमध्ये विविध प्रकारच्या झाडांची संगोपन करण्यात येत होते. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.