Fire Accident : कामठीत दुकानासह घराला आग; लाखोंचे नुकसान
Fire Damage : कामठीच्या धोबीपुरा-हमालपुरा भागात प्यारेलाल जयस्वाल यांच्या दुकान व घराला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
कामठी : जुनी कामठी पोलिस हद्दीतील धोबीपुरा-हमालपुरा येथे प्यारेलाल छोटेलाल जयस्वाल यांच्या दुकान व घराला आग लागल्याने संपूर्ण साहित्य खाक झाले. यात सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता.२३)रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.