esakal | सुखासाठी घरात लावला दिवा आणि पडले घराबाहेर; तेवढ्यात झाला घात; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर  

बोलून बातमी शोधा

प्राप्त माहितीनुसार अंकुश रामटेके हे मागील काही वर्षापासून जोगेश बोरीकर यांच्या घरी भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपली दैनंदिन कामे उरकून पूजा घरात दिवा लावला. ते कामानिमित्त सपत्निक बाहेर निघून गेले.

प्राप्त माहितीनुसार अंकुश रामटेके हे मागील काही वर्षापासून जोगेश बोरीकर यांच्या घरी भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपली दैनंदिन कामे उरकून पूजा घरात दिवा लावला. ते कामानिमित्त सपत्निक बाहेर निघून गेले.

सुखासाठी घरात लावला दिवा आणि पडले घराबाहेर; तेवढ्यात झाला घात; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर  
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडी ( जि. नागपूर) :  आधीच कोरोनाच्या या भीषण संकटात व्यवसाय, मजुरी, नोकऱ्यावर विपरीत परिणाम पडल्याने स्लम व गरीब कुटुंबीयांना कामासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच वाडी स्थित डॉ.आंबेडकर नगरातील चरडे ले-आउट येथील जोगेश बोरीकर यांच्या घरी भाड्याने राहणारे अंकुश रामटेके यांच्या घरी लागलेल्या आगीमुळे रामटेके कुटुंब अधिक संकटात सापडले आहे. या घराला लागलेल्या आगीत घरातील आवश्यक साहित्य जळून खाक झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार अंकुश रामटेके हे मागील काही वर्षापासून जोगेश बोरीकर यांच्या घरी भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपली दैनंदिन कामे उरकून पूजा घरात दिवा लावला. ते कामानिमित्त सपत्निक बाहेर निघून गेले. घरी लहान मुली बाहेर खेळत होत्या. दरम्यान हा पूजेचा पेटता दिवा खाली पडला व कापडाला आग लागली. काही वेळानंतर हे जळते कापड खाली बेडवर पडल्यामुळे गादीला आग पकडली. 

नागपुरात का फुगतोय कोरोनाचा आकडा? धक्कादायक माहिती आली समोर; चूक नेमकी कोणाची? 

काही वेळानंतर बाहेर धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी त्या खोलीकडे धाव घेतली. तातडीने वाडी मुख्याधिकारी जुमाँ प्यारेवाले यांना समजताच त्यांनी अग्निशमन विभागाला त्वरित घटना स्थळी पोचण्याचे निर्देश दिले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे रोहीत शेलारे, अनुराग पाटील, कार्तिक शहाणे, वैभव कोलस्कर, नितेश वघारे इत्यादींनी घटनास्थळी पोचून या आगीवर पाण्याचा मारा करून काही वेळानंतर आग नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत या आगीमुळे घरातील दैनंदिन गरजेचे साहित्य जळून खाक झाले होते. 

लॉकडाऊनमुळे कोरोना खरंच थांबेल? व्यापाऱ्यांचा सवाल;...

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आधीच त्रस्त असून या संकटाने रामटेके परिवार अधिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटनात वाढ होत असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन वाडी न.प.चे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ