
नागपूर : धुलीवंदनाच्या दिवसापासून सुरू झालेल्या आगीच्या घटनांची मालिका थांबत नसून मागील २४ तासांमध्ये तीन ठिकाणी कचऱ्याला आग लागल्याचा घटना घडल्या. स्नेहनगर, सक्करदरा येतील बुधवार बाजार व एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. रौद्र रूप घेण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली.