नागपूर : ओडिशातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या २३ हत्तींच्या कळपातील दोन हत्ती मुक्त संचार करताना थेट ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले आहेत. भरकटलेल्या या दोन हत्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. .मात्र, सिंदेवाही तालुक्यातील गौडमशी बिट क्षेत्रात एका वृद्धाला हत्तीने हल्ला करून ठार मारल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे भ्रमणमार्ग आणि ते मानवी वस्तीजवळ आल्यास कळावे म्हणून या दोन हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे..ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (बफर) उपसंचालक यांच्या विनंतीवरून दिल्लीच्या वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संस्थेने हत्तींना लावण्यासाठी दोन रेडिओ कॉलर खरेदी करून देण्याचे मान्य केले आहे. या कॉलर विदेशातून आयात कराव्या लागतात. त्यासाठी राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षकाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतरच केंद्र शासनाची परवानगी घेऊन आयात परवानगी घेतली जाते..त्यानंतर रेडिओ कॉलर आयात होतील. रेडिओ कॉलर लावण्यासाठी हत्तीला पकडणे, त्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध करणे हे सोपस्कर पार पाडल्यानंतरच रानटी हत्तींना कॉलर लावण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. मात्र, डब्ल्यूडब्ल्यूएफच्या नॅशनल एलिफंट कन्झर्व्हेशन ॲण्ड बिल्डिंग कपॅसिटी या योजनेअंतर्गत ही मोहीम राबविली जात आहे..हा प्रयोग यशस्वी ठरल्यास हत्तींच्या संवर्धनात अडथळा ठरणारा मानव-हत्ती संघर्ष कमी होऊन त्यांना सुरक्षित अधिवास मिळवून देण्यास मदत होईल. विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यात भ्रमंती केल्यानंतर कळपापासून वेगळे झालेले हे दोन हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात आले आहेत. ते मानवी वस्तीत येऊन धुडगूस घालत आहेत. त्यामुळे रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडिओ कॉलर लावल्यामुळे हत्ती गावाजवळ आल्यास त्यांना पुन्हा जंगलात हुसकावून लावणे सोपे होईल, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे..Data Leak : इंटरनेटवरील १६ अब्ज ‘पासवर्ड’ उघड; जगभरातील लाखो जणांची गोपनीय माहिती धोक्यात.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलेल्या जंगली हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याचा प्रस्ताव आहे. तसे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे पाठविले आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर या प्रक्रियेला गती येईल. रेडिओ कॉलर लावल्यामुळे हत्ती गावाजवळ येत असल्यास त्याची माहिती तत्काळ मिळेल आणि मनुष्यहानी टळेल.- डॉ. प्रभुनाथ शुक्ल,क्षेत्रसंचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.