शाळेने रोखला निकाल, ५ वर्षांचा चिमुकला थेट पोहोचला न्यायालयात

court
courte sakal
Updated on

नागपूर : शुल्क न भरल्याच्या कारणावरून प्रगती पुस्तिका आणि पुढल्या वर्गातील प्रवेश अडवून ठेवल्याने पाच वर्षांच्या चिमुकल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या (mumbai high court) नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयाने दणका देत मुलाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. (five year old moves to high court as school withholds result)

court
कुठे गेल्या ओबीसी नेत्यांच्या घोषणा; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?

याचिकेनुसार, धैर्य बनसोड हा चिमुकला विद्यार्थी मदर पेट किंडरगारटेन शाळेमध्ये इयत्ता केजी वनमध्ये शिकतो. शैक्षणिक संत्र संपल्यानंतर त्याच्या पालकांना शाळेकडून प्रगती अहवाल मिळणे अपेक्षीत होते. मात्र, पालकांनी शुल्क न भरल्याच्या कारणाने शाळा प्रशासनाने प्रगती अहवाल आणि पुढल्या वर्गामधील प्रवेश अडवून ठेवला. कायद्याने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिला असताना शाळेची ही कृती अवैध असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. सर्व बाजू लक्षात घेता उच्च न्यायालयाने चिमुकल्या धैर्यचा प्रगती अहवाल देण्याचे आदेश शाळेला दिले. तसेच, केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिवा, शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दोन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. एस. एस. सन्याल यांनी, शासनातर्फे ॲड. उल्हास औरंगाबादकर यांनी आणि ॲड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com