Flesh Trade
sakal
नागपूर - स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घरातच देहव्यापार करून घेणाऱ्या एका महिलेवर गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (ता.२४) रात्रीच्या सुमारास इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.