
-तुषार पिल्लेवान
नागपूर : नदी आणि नाल्यांच्या काठावर वसलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल १५७ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका (संवेदनशील) असल्याचे प्रशासनाने ओळखले आहे. यापूर्वीही या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात महापालिकेसह ग्रामीणमध्ये जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. प्रशासनाने या गाव वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याबरोबरच पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक सर्व आखणी केली आहे. जिल्हाधिकारी ते तालुकास्तरापर्यंत आढावा बैठका घेऊन पूरनियंत्रण उपाययोजना निश्चित केल्या आहेत.