दसऱ्याला फूल खाणार भाव!

ताटवे फुललेच नाहीत, ७५ टक्के उत्पादनाला फटका
झेंडू
झेंडूsakal
Updated on

नागपूर : दसरा सण चार दिवसांवर आला असतानाच सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटले आहे. परिणामी ७५ टक्के फुलांचे नुकसान झाल्याने बाजारपेठांमधील आवक घटली. दसऱ्याला झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असले. आवक आणि मागणीत तफावत निर्माण झाल्याने आठवीपासूनच फुलांचे दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

झेंडू
काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुलांवर बुरशीजन्य रोगामुळे ती खराब झालेली आहे. तसेच कीड आणि अळ्या पडल्याने फुले काळी पडलेली आहे. शेतातील फुलांचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. परंतु, रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने कीड कमी होताना दिसत नाही. फुलांची गळती अद्यापही थांबलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असताना उत्पादनही ७५ टक्के कमी झालेले आहे. त्याचा फटका येत्या सणासुदीच्या दिवसात बसण्याची शक्यता आहे. अद्याप फुलांची आवक आणि मागणी दोन्ही सारखी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत.

फुलविक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. ओला आणि सुका झेंडू अशा दोन प्रकारांत फुलांची विक्री होत असून ओला झेंडू सध्या होलसेलमध्ये ३० रुपये किलोने, तर सुका झेंडू ६० रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र, दोन दिवसांनी येणाऱ्या नववी आणि दसरा सणाला फुलांची प्रचंड मागणी असते. खराब झेंडुमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दिवसेंदिवस झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. झेंडूमध्ये कोलकता झेंडू, पिवळा झेंडू अशा वेगवेगळ्या प्रकारांतील झेंडूची फुले बाजारात उपलब्ध आहेत. झेंडू ६० ते ८० रुपये किलो असून तो १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचणार आहे. शेवंती सध्या ८० रूपये असून लवकरच १५० रुपये गाठेल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

"सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक कमी झालेली आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि मजुरांच्या मजुरीत झालेल्या वाढीचाही फटका फूल शेतीला बसलेला आहे. त्यामुळे दसऱ्याला दरात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे."

- जयंत रणनवरे, संचालक, ॲरोमा फ्लॉवर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com