Lok Sabha Election : लोकसभेसाठी रमेश चेन्निथाला २० ला नागपुरात

लोकसभा जिंकण्याचा निर्धार; नागपूर व अमरावती विभागात बैठका
for lok sabha election congress ramesh chennithala at nagpur on 20th january meeting
for lok sabha election congress ramesh chennithala at nagpur on 20th january meetingSakal

Nagpur News : विदर्भातील लोकसभा निवडणुकीची तयारी, इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा तसेच प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूर आणि अमरावती विभागात बैठका घेणार आहेत. नागपूरची बैठक २० जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी झाल्यानंतर चेन्निथाला काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पदाधिकारी या कार्यक्रमाला आले होते.

त्यामुळे चेन्निथाला यांना स्थानिकांसोबत संवाद साधता आला नव्हता. लोकसेभेची निवडणूक केव्हाही जाहीर होणार असल्याने काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे काँग्रेसने मागितली.

जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना इच्छुक उमेदवारांची नावे पाठवण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर चेन्निथाला राज्यातील प्रत्येक विभागाच्या मुख्यालयी जाणार आहेत. विदर्भाचा त्यांचा दौरा ठरला आहे. १८ जानेवारीला अमरावती आणि २० जानेवारीला नागपूरला ते येणार आहेत.

प्रदेश प्रभारी सकाळच्या सत्रात प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हानिहाय प्रमुख पदाधिकारी व कार्याकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, मतांमधील अंतर, उमेदवारांबाबत मत, झालेल्या चुका सोबत आगामी निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल, याची ते सविस्तर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.

मागील लोकसभा निवडणूक झालेल्या पराभावनंतरही काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. नागपूरमधील सहापैकी दोन जागा तर ग्रामीणमधील सहापैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

त्यानंतर नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ या दोन निवडणूक जिंकून भाजपच्या दिग्गजांचा पराभव केला. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे गड समजले जात होते.

आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याने उमेदवार निवडतानाचा खबरदारी घेण्यात येणार असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com