
नागपूर : राज्य सरकारने २४ जून आणि १७ जुलैला काढलेल्या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीच्या आदेशात अक्षरक्षः लपंडाव झाल्यासारखे दिसते. प्रतीक्षेत असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि पदोन्नती झालेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक अशा दोन वरिष्ठ प्रधान मुख्य वनसंरक्षकांना नवीन पदी पदोन्नती दिली.