
नागपूर : पांढऱ्या संगमरवरी शाळुंकेवर नर्मदेतील पंचरंगाची छटा असलेले सुंदर शिवलिंग, त्यावर हिरव्याकंच बेलाची रास, पांढऱ्या स्वस्तिकाच्या फुलांची आरास आणि गाभाऱ्यात मंद तेवणारा नंदादीप, हे दृष्य आहे महालातील भोसलेकालीन शिवमंदिराचे. श्रावणातल्या सोमवारी इथे भाविकांची गर्दी होते. एरवी हे स्थान एकांताचे असते.