नागपूर: गणेशपेठ पोलिसांकडून चारचाकी वाहनातून एमडीची तस्करी करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलाला गणेशपेठ पोलिसांनी एमडीसह सावजी भोजनालयाजवळ रविवारी पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास अटक केली. याप्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. .संकेत अजय बुग्गेवार (वय २९, रा. आशिर्वादनगर, एनआयटी मार्केट जवळ) असे आरोपीचे नाव आहे. अजय बुग्गेवार हे काही वर्षांपूर्वी भाजपचे महानगरपालिकेतील नगरसेवक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ पोलिसांना परिसरात एक युवक एमडी तस्करीसाठी येत असल्याची माहिती मिळाली..त्यानुसार, विशेष शाखेचे युनूस मुलाबी यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग जाधव, पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे. डोईफोडे, नुलगुंडावार, अंमलदार सागर धवन, वैभव, ललित, सुमेध, पवन मालखेडे व कमलकिशोर यांच्या पथकाने गणेशपेठ बस स्थानकासमोर असलेल्या हेडाऊ भोजनालयाजवळील एनआयटी कॉम्प्लेक्स मार्गावर सापळा रचला..एम.एच ४५ ए.व्ही ४५५४ एसयुव्ही कार तिथे येताच, पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा संकेत बुग्गेवार याला ताब्यात घेऊन त्याच्या एसयूव्हीची तपासणी केली. याशिवाय संकेतची तपासणी केली असता, त्याच्या खिशातून १ लाख ६७ हजार ७०० रुपयांचे १६.७ ग्रॅम एमडीचे चार पाऊच आढळले..Accident News: भरधाव वाहनाचा कहर; व्हॅनच्या धडकेत चिमुरडा ठार, चालक पसार.त्याला ताब्यात घेत, विचारणा केली असता, प्रणय बाजारे (वय २५, रा. आशिर्वादनगर, एनआयटी मार्केटजवळ) याच्याकडून आणल्याची माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल, एसयूव्ही कारसह १८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.