
नागपूर : केरळला प्रथमच रणजी करंडकाच्या ‘फायनल’मध्ये पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलणारा विदर्भाचा माजी फिरकीपटू आदित्य सरवटे यावेळी विदर्भाविरुद्ध खेळणार असल्याने त्याचा परिवार यावेळी द्विधा मनःस्थितीत राहणार आहे. असे असले तरी ‘फायनल’ केरळच जिंकून रणजी ‘चॅम्पियन’ व्हावा, अशी सरवटे परिवाराची मनापासून इच्छा आहे. तशी भावना आदित्यची आई अनुश्री सरवटे यांनी ‘सकाळ’शी बोलून दाखविली.