Nagpur : कुटुंबातील चौघांची आत्महत्या ; नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील घटना

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे पचोरी कुटुंबातील चार जणांनी अज्ञात कारणावरून गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य गणेश पचोरीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.
suicide in Mowad Nagpur
suicide in Mowad Nagpursakal
Updated on

मोवाड : अज्ञात कारणावरून पचोरी कुटुंबातील चार जणांनी गळफास घेत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना नरखेड तालुक्यातील मोवाड येथे बुधवारी (ता.२) उघडकीस आली. गळफास घेतलेल्यांपैकी तिघांचे हात कमरेच्या मागे बांधलेल्या अवस्थेत होते, तर गणेशचे हात मोकळे होते. सामूहिक आत्महत्येच्या माहितीने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील रहिवासी आणि शिक्षक विजय मधुकर पचोरी (वय ६८) सन २०१६ मध्ये शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाले. गणेश (वय ३८), दीपक (वय ३५) तसेच पत्नी माला (वय ५३) असे त्यांचे चार सदस्यांचे कुटुंब होते.मोवाडच्या वार्ड क्र. ५, बाजार चौक परिसरातील ओमप्रकाश खोब्रागडे यांच्या घरी पचोरी कुटुंबीय किरायाच्या घरात राहात होते. घटनेच्या रात्री सर्व जण जेवण उरकून झोपी गेले.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळचे दहा वाजले तरी घरातील सदस्य का उठले का नाहीत म्हणून शेजारच्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांना सर्व जण गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले. त्यांना बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. दूरध्वनीवरुन घटनेची माहिती नरखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिस पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले.

कुटुंबातील चौघांची आत्महत्या गणेशवर फसवणुकीचे गुन्हे

कुटुंबातील मोठा मुलगा गणेश विजय पचोरी याने पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथे मातृसेवक इंडिया निधी लिमिटेड या नावाने पतसंस्था सुरू केली होती. तो या संस्थेचा संचालक होता. पैशाची अफरातफर केल्याच्या कारणावरून त्याच्यावर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ फेब्रुवारीला त्याला अटक झाली होती. पांढुर्णा पोलिसांत त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. ८ ऑगस्ट रोजी तो जामिनावर सुटून घरी आला होता. याशिवाय महाराष्र्टातील अनेक ठिकाणी त्याने फसवणुकीचे व्यवहार केले असल्याची चर्चा परिसरात होती.

बर्मुड्याच्या खिशात ‘सुसाईड नोट’

पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रूग्णालय नागपूर येथे पाठवले आहेत. पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश याच्या बर्मुड्याच्या खिशात सर्वांच्या सह्यांनिशी एक ‘सुसाईड नोट’ आढळली. आम्ही चौघेही जण स्वेच्छेने आत्महत्या करीत आहोत, असे त्यात लिहिले आहे. एकंदरीतच गुंतागुंतीच्या या सर्व प्रकरणाचा तपास नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली नरखेडचे ठाणेदार अजित कदम, मोवाड पोलिस चौकीचे पोलिस कॉन्स्टेबल संजय इंगोले व प्रेमराज सनेसर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com