नागपूरकरांनो काळजी घ्या! 'हे' झोन बनले कोरोना हॉटस्पॉट; गृहविलगीकरणातील बाधितांच्या घरांवरही स्टिकर

four zone is corona hot spot in nagpur corona update
four zone is corona hot spot in nagpur corona update

नागपूर : शहरातील आज एकाच दिवशी दोन हजार ९१३ बाधित आढळून आले असून महापालिकेच्या चार झोनमध्ये निम्म्यापेक्षा जास्त बाधित असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. लक्ष्मीनगर, धरमपेठ, मंगळवारी, हनुमाननगर झोन 'हॉटस्पॉट' ठरले आहेत. सर्वाधिक ४९४ बाधित लक्ष्मीनगर झोनमधील आहेत. दरम्यान, महापालिकेने गृहविलगीकरणातील बाधितांच्या घरांवर स्टिकर लावून परिसरातील नागरिकांना सावध करण्याचा नवा पर्याय शोधून काढला आहे. 

शहरात गुरुवारी तीन हजारांच्या जवळपास बाधित आढळून आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ माजली आहे. महापालिकेच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, मंगळवारी झोनमध्ये एकूण १५९४ बाधित आढळून आले असून ही संख्या एकूण संख्येच्या निम्म्यापेक्षाही जास्त आहे. मागील वर्षी हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वाधिक कमी ८५ बाधित आहेत. मोठ्या प्रमाणात बाधित आढळलेल्या झोनमध्ये उपाययोजनांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांच्या घरांवर महापालिकेने स्टिकर लावण्यास सुरुवात केली. स्टिकरद्वारे परिसरातील नागरिकांना सावध करणे तसेच संबंधित घरातील बाधित व्यक्ती बाहेर पडल्यास त्याची माहिती घेणे, या उद्देशाने स्टिकर लावण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. स्टिकरवर पॉझिटिव्ह कोविड-१९ रुग्ण होम आयसोलेशन' असे नमुद करण्यात आले असून त्यावर रुग्णाचे नाव व होम आयसोलेशनचा कालावधी ठळकपणे स्पष्ट करण्यात आला आहे. 

गृहविलगीकरणातील बाधितांना फॅबीफ्लू नाही - 
गृहविलगीकरणातील बाधितांना महापालिकेतर्फे आतापर्यंत फॅबीफ्लू (फेवीपायरेवायर) टॅबलेट देण्यात येत होत्या. परंतु, आज महापालिकेला अचानक राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा साक्षात्कार झाला. राज्य शासनाच्या २२ जुलै २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गृहविलगिकरणातील लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना या गोळ्या देण्याच्या सूचना नसल्याच्या कारणावरून टास्क फोर्स समितीच्या बैठकीत या गोळ्या न देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

झोननिहाय पॉझिटिव्ह रुग्ण -

झोन बाधितांची संख्या 
लक्ष्मीनगर ४९४ 
धरमपेठ ३३३ 
हनुमाननगर ३८६ 
धंतोली २७० 
नेहरूनगर २९४ 
गांधीबाग २१५ 
सतरंजीपुरा ८५ 
लकडगंज १८१ 
आशीनगर २७४ 
मंगळवारी ३८१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com