नागपूर ः एका भोंदूबाबाने एका आजारी महिलेच्या अज्ञानाचा आणि गरीबीचा फायदा घेत जादूटोण्याच्या जाळ्यात फसवले. महिलेकडून एक लाख रुपये उकळल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राज साहबराज मंदी ऊर्फ गिरी महाराज (२५) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा भक्त रंजीत याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माला सुरेश शर्मा (६२, रा. भिवसनखोरी) या दाभा चौकात चहा आणी पानटपरी चालवते. गेल्या २५ जानेवारीला गिरी महाराज आणि त्याचा भक्त रंजीत हे दोघे माला शर्मा यांच्या घरी जादूटोण्याचे तेल विकण्यासाठी आले होते. त्यांनी घरात मालाच्या मुलाला बघितले. मुलावर भूतबाधा झाल्याचे सांगत पूजापाठ करावी लागणार असा सल्ला दिला.
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या माला यांनी भूतबाधा काढण्यासाठी खर्चाबाबत गिरी महाराजाला विचारणा केली. चार लाख रूपये आणि रोज कोंबडी लागेल, असे गिरी महाराजाने सांगितले. गरीब असलेल्या मालाने मुलाच्या भवितव्यासाठी नातेवाईकांकडून एक लाख रुपये जमा केले आणि गिरी महाराजाला दिले. उर्वरित रक्कम मुलाच्या अंगातील भूत उतरल्यानंतर देण्याचे ठरले. गिरी महाराज माला यांच्या घरी आले. त्यांनी देवघरासमोर मोठा खड्डा खोदला. मुलाला खड्ड्यात बसवून मंत्रतंत्र जपले. दुसऱ्या दिवशी भूत निघाल्याचे सांगून निघून गेला. मुलाला रोज लावण्यासाठी अंगारा दिला आणि तिसऱ्या दिवसापासून माला यांना उर्वरित ३ लाख रुपये मांगू लागला.
कुटुंबावर जादूटोणा करण्याची धमकी
मालाच्या मुलाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अंगारा-धुपारा झाला तरीही काय फरक पडला नाही. परंतु, गिरी महाराजावर रोज जादूटोणा करून जीवे मारण्याची धमकी माला यांना देऊ लागला. तिच्या घरावर निंबू फेकणे आणि दरवाज्यावर कुंकू लावण्याचा प्रकार गिरी महाराज करीत होता. त्यामुळे माला यांनी भीतीपोटी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सध्या गिरी महाराज चार दिवस पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.