esakal | मॅट्रीमोनीवरील प्रेम पडले महाग! उच्चशिक्षित तरुणीला साडेचार लाखांनी गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

मॅट्रीमोनीवरील प्रेम पडले महाग! उच्चशिक्षित तरुणीला साडेचार लाखांनी गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पुण्यातील मोठ्या कंपनीत इंजिनिअर असलेल्या युवतीने लग्न ठरविण्यासाठी शादी डॉट कॉमवर नोंदणी केली. काही दिवसांतच इंग्लंडमध्ये आर्किटेक्ट असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. भेटीला भारतात आल्याचे सांगून कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून सुटका करण्यासाठी युवतीकडून ४ लाख २२ हजार रुपये घेत फसवणूक (online fraud) केली. कमल बंजारी (२९, रा. गुलमोहर अपार्टमेंट, टेका नाका) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा: अमरावतीत दोन मंत्री आमने-सामने, यशोमती ठाकूरही दाखल करणार अर्ज

कमल ही पुणे येथील इन्फोसीस कंपनीत अभियंता पदावर नोकरीवर होती. तिच्या वडिलांची प्रकृती बरी राहात नसल्याने दोन महिन्यांपूर्वी नोकरी सोडून ती नागपूरला आली होती. काही दिवसांपूर्वी तिने लग्नासाठी शादी डॉट कॉमवर आपल्या नावाची नोंदणी केली होती. ६ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ च्या सुमारास नार्वे (यूके) येथील विजय अभय खरे (३१) या युवकाने कमलला रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले. मी नार्वे येथे आर्किटेक्ट असून लवकरच मी भारतात स्थायिक होणार आहे असे सांगितले. कमलने त्याच्यावर विश्वास ठेवला. विजय लग्न करणार असल्यामुळे कमल खुश होती. तिने लग्नाचे स्वप्न बघने सुरू केले होते.

विमानतळावरील कस्टम अधिकारी

काही दिवसांनी एका महिलेने कमलला फोन केला. विजय खरे यास दोन कोटी रुपयांसह दिल्लीच्या कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यामुळे त्याला दंड झाला आहे. दंड भरावा लागेल, अशी थाप मारली. कमलचाही त्यावर विश्वास बसला. कमलने ४ लाख २२ हजार रुपये पाठविले. तरीही पैशासाठी त्यांची मागणी सुरूच होती. कमलने विजयला फोन लावला असता त्याचा फोन बंद होता. अनेकदा प्रयत्न करूनही विजयचा फोन बंद येत असल्याने कमलला संशय आला. याप्रकरणी कोमलच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सायबर गुन्हेगारांची टोळी

विवाह संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या तरूण-तरूणींची यादी सायबर गुन्हेगारांची टोळी विकत घेते. विवाह संकेतस्थळ सूचविणारे मुला-मुलींची यादी विकतात. त्यानंतर ही टोळी तरूणींनी युवकांच्या नावाने फोन करतात तर युवकांना युवतींच्या नावाने फोन करतात. नेहमीप्रमाणे विमानतळावर कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून पैसे उकळतात

loading image
go to top